चंदीगढ – प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी सुनावलेली तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यानंतर दलेर मेहंदींना पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी प्रकरणात अटक केली आहे. दलेर मेहंदींवर अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप आहे. याआधी पटियालाच्या न्यायालयाने दलेर मेहंदींना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देत दलेर मेहंदी यांनी पटियाला सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. ग्रेवाल यांनी दलेर मेहंदींची याचिका फेटाळून लावली. या निर्णयानंतर पोलिसांनी दलेर मेहंदींना अटक केली.
राज्यात पुन्हा लॉकडाऊनसारखी स्थिती; संजय राऊत म्हणाले…
या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले. मात्र, येथे दलेर मेहंदींना मोठा झटका बसला असून न्यायालयाने त्याची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. या आधी दलेर मेहंदींना 3 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने बेल मिळाली होती. तसेच दलेर मेहंदीचा मोठा भाऊ शमशेर सिंग हाही मानवी तस्करी प्रकरणी आरोपी आहे.
अर्थमंत्र्यांनी एक आर्थिक ज्योतिषी नियुक्त करावा; माजी केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला