ओतूर – राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, नॅशनल बी व हनी मिशन आणि पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण ओतूर व पाईटच्या दूध शीतकरण केंद्र येथे 21 ते 28 फेब्रुवारीदरम्यान पार पडले.
या प्रशिक्षणामध्ये मधमाशीचे मानवी जीवनातील स्थान, तिच्या जाती, पोळ्याची रचना,े रोग व किडी, मधमाशी मध व इतर पदार्थ कसे तयार करते, राणी माशीचे विभाजन कसे करावे याबाबत 25 शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती मिळाली.