सातारा, {प्रतिनिधी} जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलेल्या विलास उर्फ यल्ल्या शरणाप्पा कुरमणी (वय 23, रा. आंबेडकर भवन, एमआयडीसी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा) याने हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सागर दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
कुरमणी हा गोडोलीतील ठक्कर सिटीसमोरच्या वसाहतीत वावरताना पोलिसांना सापडला. त्याला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी जारी केला होता.
मात्र, हद्दपारीनंतरही तो सातार्याच्या हद्दीत वावरताना वारंवार आढळून आला. त्यामुळे त्याला सीआरपीसी 41 प्रमाणे नोटीस बजावून कारवाई करण्यात आली. हवालदार अवघडे तपास करत आहेत.