India vs South Africa ODI Series : टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटल्यानंतर आता उद्यापासून (रविवार) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करेल. तर जाणून घ्या… ODI मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, दोन्ही संघांचे खेळाडू आणि सामन्यांच्या वेळेसह सर्वकाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना दुपारी साडेचार वाजता सुरू होईल. दुसरा एकदिवसीय सामना 19 डिसेंबर रोजी गकेबरहा येथे खेळवला जाईल आणि तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळला जाईल.
सामना कधी, कुठे आणि कसा लाइव्ह पहाल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट पाहू शकता. तर मोबाईलवर सामना पाहणारे दर्शक डिस्नेप्लस हॉटस्टारवर सर्व सामने विनामूल्य पाहू शकतील. याशिवाय तुम्ही सर्व सामन्यांचे अपडेट्स आणि बातम्या आमच्या डिजीटल प्रभातच्या बेवसाईटवर वाचू शकता.
INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…
एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक…
पहिली वनडे – 17 डिसेंबर – जोहान्सबर्ग
दुसरी वनडे – 19 डिसेंबर- गेबेर्हा
तिसरी वनडे – 21 डिसेंबर – पार्ल.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल. , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.
ICC T20 World Cup 2024 : न्यूयार्कमध्ये रंगणार भारत-पाक लढत…
वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ – एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेझ वॅन डीसी, रास डुसेन, काइल व्हेरिन आणि लिझाद विल्यम्स.