मुंबई – ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे आज मंगळवारी (दि.14) सकाळी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पीआरएस ओबेरॉय यांनी 2022 मध्ये ईआयएच लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे अध्यक्षपद सोडले होते.
महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स सुरू करुन आंतरराष्ट्रीय लक्झरी प्रवाशांसाठी ओबेरॉय हॉटेल्सची सेवा सुरू करण्याचं श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना जाते. ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या विकासात पीआरएस ओबेरॉय यांनी प्रमुख भूमिका बजावली असल्याचे ओबेरॉय समूहाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे.
पीआरएस ओबेरॉय यांना जानेवारी 2008 मध्ये देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणनने सन्मानित करण्यात आले होते. ओबेरॉय ग्रुप ही जगातील आघाडीच्या लक्झरी हॉटेल चेनपैकी एक आहे.