सेऊल – उत्तर कोरियाने आता विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. गेल्या काही आठवड्यांत उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांच्या एकूण चार चाचण्या घेतल्या आहेत. तथापि, असे असले तरी अमेरिका आणि दक्षिण कोरियाशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असेही उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांनी स्पष्ट केले आहे.
कोरियन द्विपकल्पात शांतता कायम ठेवण्यासाठी दक्षिण कोरियाबरोबर हॉटलाइन संपर्क प्रस्थापित करण्यासही ते राजी असल्याचे त्या देशाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आमच्याशी चर्चेला उत्सुक असाल तर डबल डिप्लोमसी सोडून द्या, असा सल्लाही त्यांनी दक्षिण कोरियाला दिला आहे.
उत्तर कोरियाने गुरुवारी विमानविरोधी क्षेपणास्त्राची ही चाचणी घेतली असली तरी त्याला दक्षिण कोरिया, जपान किंवा अमेरिकेकडून दुजोरा मिळालेला नाही. या देशांनी त्यांच्या एरवीच्या चाचण्यांना वेळोवेळी दुजोरा दिला आहे.