आता देवाचे घरही असुरक्षित! कोथरूडमधील मंदिराची दानपेटी फोडून २ लाखांची रोकड लंपास
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कोथरूड भागातील एका मंदिरातील दानपेटी उचकटून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील उजवी भुसारी काॅलनीत संकल्प सिद्धी हनुमान मंदिर आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरटे मंदिरात शिरले.
चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून दोन लाख रुपयांची रोकड चोरून ते पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी भेट दिली. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभार तपास करत आहेत.





