बारामती, (प्रतिनिधी)- विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. त्यानंतर एज्युकेशनल हब म्हणून बारामतीची ओळख निर्माण होत आहे. बारामती शहरामध्ये कमीत कमी विद्यार्थ्यामध्ये आयआयटी-जेईई परीक्षेत सर्वात जास्त निकाल देणारी लडकत सायन्स अॅकॅडमी,
नीट परिक्षेमध्ये शेकडो विद्यार्थी घडवणारी सक्सेस कोड अॅकॅडमी यांनी एकत्रित येत नीट परीक्षेसाठी तयारी करु इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टार्गेट एमबीबीएस हा दोन वर्षाचा ११ वी व १२ वी सायन्स इंटीग्रेटेड कोर्स सुरु केला आहे. या संधीचा राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन लडकत सायन्स अॅकॅडमीचे संचालक नामदेव लडकत यांनी केले आहे.
अगदी माफक फीमध्ये आता अत्याधुनिक शिक्षण पध्दतीचे बारामती शहरात नीटसाठीचे शिक्षण मुलांना उपलब्ध होणार आहे. फक्त दोन वर्षामध्ये सक्सेस कोड अॅकॅडमीचे २० विद्यार्थी देशभरातील विविध शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत आहेत.
इतर कोठेही न जाता आता आपल्या बारामती शहरामध्येच मुलांनी नीट परीक्षेतून शासकिय महाविद्यालयात एम. बी. बी.एस प्रवेशासाठी अपेक्षित मार्क्स मिळवणे सहज शक्य आहे, असे संबोधन विद्यार्थ्याना सक्सेस कोड अॅकॅडमीचे संचालक ए. पी. भुजबळ यांनी केले.
लडकत ॲकॅडमी पालकांची प्रथम निवड
लडकत सायन्स अॅकॅडमीमध्ये ५ वी ते १२ वी विज्ञान तसेच नीट व जेईईसाठी स्वतंत्र इमारतआय. आय.टी/एन.आय.टी तसेज कोटा (राजस्थान) लातूर, पुणे, हैद्राबाद येथील अनुभवी वर्ग मुला- मुलीसाठी सुरक्षित हॉस्टेल सुविधा, लोकल विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, प्रत्येक अठवडयात परीक्षा अभ्यासामध्ये मागे असणाऱ्या मुलांसाठी वैयक्तिक लक्ष व जास्तीचे वर्ग अशा सुविधा अॅकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जातात. अल्पावधीमध्येच लडकत सायन्स सुजान पालकांची प्रथम निवड ठरली आहे.