Novak Djokovic Exit : २० वर्षांत पहिल्यांदाच घडलं! २४ ग्रँडस्लॅम जिंकणारा दिग्गज पहिल्याच फेरीत बाहेर; म्हणाला, सलग उलट्या अन् शरीराने…
Novak Djokovic Exit : महान खेळाडू आणि २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाला. सामन्यानंतर त्याने आपल्या शारीरिक समस्यांबद्दल खुलासा केला.

Novak Djokovic Shocking First Round Exit US Open 2026 Mariano Navone Illness Physical Struggle : २४ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्बियन टेनिस सम्राट नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याला यूएस ओपन २०२६ च्या पहिल्याच फेरीत अनपेक्षित व धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. अर्जेंटिनाच्या मारियानो नवोनेने ३९ वर्षीय जोकोविचला पहिल्याच फेरीत बाहेरचा रस्ता दाखवला. कोर्टवर असह्य शारीरिक त्रास, उलट्या, अंगदुखी आणि क्रॅम्प्समुळे हा सामना खेळणे म्हणजे एक भयानक अनुभव होता, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जोकोविचने सामन्यानंतर दिली.
उलट्या, क्रॅम्प्स अन् पाठीचे दुखणे; शरीराने दिला पूर्णपणे नकार –
एटीपीशी बोलताना जोकोविच म्हणाला, “हा सामना माझ्यासाठी अतिशय क्लेशदायक राहिला. दुर्दैवाने या संपूर्ण वर्षात मला शारीरिक समस्यांशी झुंजावे लागले आहे. सतत होणाऱ्या उलट्यांमुळे माझे शरीर थकून गेले. त्यात क्रॅम्प्स, खांदा आणि पाठीच्या दुखण्याने अखेरच्या क्षणी माझी पूर्ण साथ सोडली.” दोन सेट जिंकून आघाडीवर असतानाही चौथ्या सेटपासून शारीरिक त्रासाने रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे सामना त्याच्या हातून निसटला.
२००६ नंतर पहिल्या फेरीत पराभवाची नामुष्की; २० वर्षांचा विक्रम मोडला –
Massive upset as Mariano Navone (+390) takes down Novak Djokovic in 5 sets!
That’s Djokovic’s first ever first round exit at the US Open 🤯 pic.twitter.com/hg1Hg5vng4
— Action Network (@ActionNetworkHQ) August 31, 2026
या पराभवाने जोकोविचच्या कारकिर्दीतील एका मोठ्या विक्रमाचा अंत झाला. २००६ च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर जोकोविच कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला नव्हता. तब्बल २० वर्षांनंतर पहिल्या फेरीतच पराभूत होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली आहे. शारीरिक परिस्थिती इतकी गंभीर होती की त्याने सामन्यातून माघार घेण्याचाही विचार केला होता; मात्र लढवय्या बाण्यामुळे त्याने सामना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
न्यूयॉर्कच्या प्रेक्षकांचा पाठिंबा पाहून जोकोविच झाला भावूक!
LE STADIUM ASHE STADIUM DEBOUT POUR NOVAK DJOKOVIC. 👏
Éliminé dès le premier tour après 4h36 de combat et une soirée extrêmement difficile physiquement, le Serbe quitte le court sous une immense ovation. ❤️🩹
La grande question : reviendra-t-il ? 🥺 pic.twitter.com/oggcF7VupS
— Univers Tennis 🎾 (@UniversTennis) August 31, 2026
निर्णायक सेटमध्ये १-३ ने मागे असताना न्यूयॉर्कच्या चाहत्यांनी जोकोविचला उभे राहून जबरदस्त पाठिंबा दिला, ज्यामुळे सर्बियन दिग्गज चांगलाच भावूक झाला. “प्रेक्षकांचे प्रेम अतुलनीय होते. कोर्टवरील खेळाचा आणि शरीराचा मला तिरस्कार वाटत असताना चाहत्यांनी दिलेली ऊर्जा मनाला स्पर्शून गेली. मी त्यांच्या अपेक्षेनुसार खेळू शकलो नाही याचे मला अतीव दुःख आहे,” अशा शब्दांत जोकोविचने भावना व्यक्त केल्या.





