Vaibhav Sooryavanshi Record : अवघ्या ८ धावांनी हुकले शतक, पण रचला मोठा इतिहास! वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीत मोडला ५७ वर्षे जुना विक्रम
Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशी दुलीप ट्रॉफीच्या संपूर्ण इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला आहे.

Vaibhav Sooryavanshi Breaks 57 Year Old Duleep Trophy Record Youngest Fifty : भारतीय क्रिकेटचा नवा उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) पुन्हा एकदा आपल्या बॅटने मैदान गाजवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुलीप ट्रॉफी २०२६ च्या उपांत्य सामन्यात ईस्ट झोनकडून खेळताना वैभवने सेंट्रल झोनविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करत अवघ्या ४२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यासह तो दुलीप ट्रॉफीच्या संपूर्ण इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला असून त्याने तब्बल ५७ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
४२ चेंडूंत अर्धशतक ठोकत मोडला ५७ वर्षांपूर्वीचा विक्रम –
३१ ऑगस्ट २०२६ रोजी हा विक्रम रचताना वैभवचे वय अवघे १५ वर्षे आणि १५७ दिवस होते. यापूर्वी दुलीप ट्रॉफीत सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम लक्ष्मण सिंह यांच्या नावावर होता, ज्यांनी १९६९ मध्ये १६ वर्षे २३ दिवस वय असताना अर्धशतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू पियुष चावला (१६ वर्षे ३०७ दिवस, २००५) आहे. वैभवने ५७ वर्षांपूर्वीचा हा मोठा विक्रम मोडून भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.
शतक अवघ्या ८ धावांनी हुकले; ७ चौकार अन् ७ गगनचुंबी षटकार!
100-run stand 🙌
Vaibhav Sooryavanshi and Abhimanyu Easwaran with a solid opening stand so far 🤝
Scorecard ▶️ https://t.co/kyExeix2VY pic.twitter.com/7eVSb3iuPU
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 31, 2026
सेंट्रल झोनच्या २६६ धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन सलामीला उतरले. वैभवने सुरुवातीपासूनच ११६.४६ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने आक्रमण केले. अर्धशतकानंतर त्याने शतकाकडे वेगाने कूच केले; मात्र आणखी एक षटकार खेचण्याच्या नादात तो बाद झाला. वैभवने अवघ्या ७९ चेंडूंत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९२ धावांची डोळे दिपवणारी खेळी साकारली. त्याचे पहिले प्रथम श्रेणी शतक अवघ्या ८ धावांनी हुकले असले, तरी त्याच्या खेळीने सेंट्रल झोनच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली.
पहिल्या सामन्यातील अपयशानंतर दमदार पुनरागमन –
HISTORIC SCENE AT THE DULEEP TROPHY! 💥🏏
15 YEARS OLD. 157 DAYS. HISTORY MADE! 🤯🔥
Vaibhav Sooryavanshi! The teenage prodigy has absolutely torn up the record books by becoming the YOUNGEST player ever to score a fifty in Duleep Trophy history! 🏆
42-ball fifty for East Zone… pic.twitter.com/AJMnv9qzI1
— sushil kadam (@imsushilkadam) August 31, 2026
हंगामातील पहिल्या सामन्यात नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध वैभव केवळ ८ धावांवर बाद झाला होता; मात्र गोलंदाजीत २ विकेट्स घेत त्याने छाप पाडली होती. त्यानंतर या उपांत्य सामन्यात मिळालेल्या जीवनदानांचा पुरेपूर फायदा उठवत त्याने आपले खरे आक्रमक रूप दाखवले. सर्वात कमी वयात प्रथम श्रेणी सामन्यात नेतृत्व आणि आता विक्रमी अर्धशतक झळकावून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपण भविष्यातील सुपरस्टार असल्याचे सिद्ध केले आहे.





