Bihar Politics : बिहार राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे हे राज्य चर्चेच्या केंद्रास्थानी आहे. बिहाराचे तब्बल ११ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी थेट राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. नितीश कुमार आता देश पातळीवरील राजकारणात सक्रिय होणार आहेत. यामुळे बिहार राज्यातील सत्तासमीकरणे बदलतील, याविषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा असेल हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. तर जेडीयू पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे सत्तेच्या चाव्या भाजपकडे येतील. तर उपमुख्यमंत्री पदी नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार विराजमान होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या राजकीय समीकरणाचा फायदा चिराग पासवान यांच्या पक्षाला होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांची बिहार विधानसभेतील सत्ता वाढेल आणि आणखी एक मंत्रीपद त्यांना मिळू शकते. यामुळे विरोधी बाकावर असलेल्या राजद पक्षाला अडचणींना तोंड द्यावे लागेल राजदसाठी धक्का (Bihar Politics) राज्यसभा निवडणुकीनंतर नितीशकुमार आपली भूमिका आणि रणनीती बदलतील असे राजदच्या नेत्यांनी सूचित केले आहे. राजदने विशेषतः तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल अधिक आक्रमक भूमिका स्वीकारलेली नाही. याचे कारण म्हणजे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना तिसऱ्यांदा त्यांच्यासोबत सत्तेत येण्याची आशा होती. पण आता नितीश बिहारच्या राजकारणात भाग घेणार नाहीत. हा राजदसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. रणनिती बदलणार (Bihar Politics) जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर राजदला आपली रणनिती बदलावी लागणार आहे. राजदच्या अडचणी वाढतील. याविषयी बोलताना राजद प्रवक्ते शक्ती सिंह यांनी महत्वाचे विधान केले आहे. “आम्ही आणि आमचे नेते लालू प्रसाद यादव नेहमीच भाजपच्या विचारसरणींविरुद्ध लढलो आहोत. आम्ही त्या मार्गावर चालत राहू. परंतु, नितीश कुमारांऐवजी भाजप आघाडीवर असल्याने आमची रणनीती बदलेल हे निश्चित आहे. अर्थात, भाजपविरुद्धची आमची रणनीती देखील पूर्णपणे नवीन असेल.” राजद आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष वाढेल असे राजकीय तज्ज्ञ सांगतात. राजदला निःसंशयपणे आपली रणनीती बदलण्याचे आव्हान पेलावे लागेल. सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा झाल्यास कोण होईल याविषयी अनेक नावांची चर्चा असली तरी शर्यतीत सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे. असे असले तरी भाजप ईबीसी किंवा ओबीसी उमेदवार उभा करून सर्वांना आश्चर्यचकित करू शकते. उपमुख्यमंत्री पदासाठी या नेत्याचे नाव शर्यतीत दलित समुदायातून आलेले आणि अनेकदा नितीश कुमार यांना त्यांचे आदर्श वडील म्हणून संबोधणारे अशोक चौधरी हे जातीच्या राजकारणाच्या समीकरणात बसतात. त्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते. हेही वाचा : Top 10 News : घरगुती गॅस महागला ते युद्धाला १२ मार्चला मिळणार पूर्णविराम?; जाणून घ्या Top 10 News एका क्लिकवर…