Bihar Politics : बिहारमध्ये सत्तांतराचा मार्ग मोकळा; नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
Bihar Politics : भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू असून त्यानंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापनेच्या दृष्टीने घडामोडी वेगाने घडत आहेत.

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. (Bihar Politics)
राजीनामा देताना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय चौधरी उपस्थित होते. दरम्यान, भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू असून त्यानंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापनेच्या दृष्टीने घडामोडी वेगाने घडत आहेत. Bihar Politics
सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारच्या स्थापनेत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलाही जवळपास निश्चित झाला आहे. भाजपकडून सुमारे 14 तर जनता दल (युनायटेड) कडून 15 मंत्र्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच चिराग पासवान यांच्या पक्षालाही दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Bihar Politics

Bihar Politics : बिहारमध्ये सत्तांतराचा मार्ग मोकळा; नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचे नाव चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून भाजप आणि JDU यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचीही माहिती आहे. Bihar Politics
मुख्यमंत्रीपदाबाबतही अनिश्चितता कायम असून भाजपकडून नवीन मुख्यमंत्री दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
या सर्व घडामोडींमुळे बिहारसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असून पुढील काही तासांत मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे. (Bihar Politics)





