Politics: ‘सम्राट’ सरकारमध्ये खातेवाटप जाहीर; गृहमंत्रालयासह २९ विभाग मुख्यमंत्र्यांकडे, जेडीयूच्या वाट्याला १८ खाती
Politics: नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी प्रशासनावर पकड मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची खाती स्वतःकडे घेतली आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालय, सामान्य प्रशासन, नगरविकास, आरोग्य, कृषी आणि उद्योग, रस्ते बांधकाम यांसह महत्वाचे २९ विभाग ठेवण्यात आले आहेत.

Politics: बिहारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. या नव्या रचनेत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व दिसून येत असून, स्वतः मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी गृह विभागासह तब्बल २९ महत्त्वाची मंत्रालये आपल्याकडे ठेवली आहेत. मित्रपक्ष असलेल्या जेडीयूच्या (JDU) वाट्याला सध्या १८ विभाग आले आहेत.
मुख्यमंत्री सम्राट चौधरींकडे सत्ताकेंद्र –
नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी प्रशासनावर पकड मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची खाती स्वतःकडे घेतली आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालय, सामान्य प्रशासन, नगरविकास, आरोग्य, कृषी आणि उद्योग, रस्ते बांधकाम यांसह महत्वाचे २९ विभाग ठेवण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांकडे मोठी जबाबदारी –
मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय चौधरी यांच्याकडे एकूण १० विभाग सोपवण्यात आले आहेत. यात जलसंपदा, शिक्षण, ग्रामीण विकास, संसदीय कार्य आणि परिवहन यांसारख्या विभागांचा समावेश आहे. तर बिजेंद्र यादव यांच्याकडे ८ विभागांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे ऊर्जा, वित्त (अर्थ), नियोजन आणि विकास, समाजकल्याण आणि वाणिज्य-कर ही महत्त्वाची खाती असतील.
Bihar Cabinet allocation | CM Samrat Choudhary keeps 29 departments, including Home, Agriculture, Health, Tourism, Art and Culture and Sports.
Deputy CM Vijay Kumar Chaudhary gets 10 departments, including Water Resources, Minority Welfare, Education, Higher Education,… pic.twitter.com/snyHPVpWpC
— ANI (@ANI) April 15, 2026
पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा –
बिहारच्या या नवीन पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. “सम्राट चौधरी यांचा उत्साह आणि जमिनीवर काम करण्याचा अनुभव बिहारला विकासाच्या नव्या उंचीवर नेईल,” असा विश्वास पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला. नितीश कुमार यांच्यानंतर आता चौधरींच्या नेतृत्वाखाली बिहार सर्वांगीण प्रगती करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?
बिहारच्या नियमानुसार मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण ३६ मंत्री असू शकतात. सध्या केवळ प्रमुख नेत्यांमध्येच खात्यांचे वाटप झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, ज्यामध्ये आणखी ३३ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्याची संधी आहे.





