Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याच्या तयारीत आहेत. 1 अणे मार्ग येथील सीएम हाऊसमधून त्यांचे सामान 7 सर्क्युलर रोडवरील बंगल्याकडे हलवले जात असून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे स्थलांतर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नीतीश कुमार यांनी 10 एप्रिल रोजी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते 14 एप्रिलला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, तर 15 एप्रिलला बिहारमध्ये नव्या सरकारची स्थापना होण्याची शक्यता आहे. Bihar Politics Bihar Politics: मुख्यमंत्री नितीश कुमारांचे सामान सीएम हाऊसमधून हलवले; 15 एप्रिलला नव्या सरकारची स्थापना होणार राजीनाम्यानंतरही ते बिहारमधील आपले वास्तव्य कायम ठेवणार असून 7 सर्क्युलर रोड येथे राहणार आहेत. त्यामुळे ते राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे शेजारी होणार आहेत. या ठिकाणी राबडी देवी (Rabri Devi) यांचे निवासस्थान अवघ्या दोन बंगल्यांच्या अंतरावर, सुमारे 200 मीटरवर आहे. 7 सर्क्युलर रोड बंगल्याचे महत्त्व – Bihar Politics 7 सर्क्युलर रोड हा बंगला नीतीश कुमार यांच्या विशेष पसंतीचा मानला जातो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांना मुख्यमंत्री केले होते. त्यावेळी नीतीश कुमार या बंगल्यात राहायला आले होते. याच ठिकाणी राहून त्यांनी पुन्हा सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि 2015 मध्ये विजय मिळवत मुख्यमंत्रीपदावर पुनरागमन केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पुन्हा 1 अणे मार्ग येथे गेले, मात्र 7 सर्क्युलर रोड बंगला त्यांनी स्वतःकडेच ठेवला होता. विरोधकांनी दोन बंगल्यांचा वापर केल्याचा आरोप केल्यानंतर हा बंगला मुख्य सचिवांच्या नावावर देण्यात आला होता. या बंगल्याचे बांधकाम नीतीश कुमार यांच्या देखरेखीखाली भूकंपरोधक पद्धतीने करण्यात आले आहे. बंगल्याच्या प्रमुख सुविधा – Bihar Politics 7 सर्क्युलर रोड परिसर हा हाय-सिक्युरिटी झोन आहे. संपूर्ण परिसराला उंच भिंती, प्रवेशद्वारे आणि सीसीटीव्ही देखरेखीची सुविधा आहे. पोलिस आणि विशेष सुरक्षा दलाची कायम तैनाती असते. या बंगल्यात 6 व्हीआयपी बेडरूम, 2 मोठे ड्रॉइंग व मीटिंग हॉल, तसेच मोठा डायनिंग हॉल आहे. समोरपासून मागच्या भागापर्यंत विस्तीर्ण लॉन असून त्यामध्ये एक लहान तलावही आहे, जिथे छठपूजेवेळी अर्घ्य दिले जाते. स्वतंत्र गार्डन, वॉकिंग ट्रॅक, पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार व वेटिंग एरिया, तसेच बैठकींसाठी वेगवेगळ्या खोल्यांची व्यवस्था आहे. प्रेस मिटिंग्स आणि राजकीय भेटीसाठी स्वतंत्र जागा, तसेच कर्मचाऱ्यांसाठी आणि सुरक्षारक्षकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था येथे उपलब्ध आहे. बंगल्यालगतच्या इमारतीत मुख्यमंत्री कार्यालयाचे गोपनीय विभाग असून सचिव आणि खासगी सहाय्यकांचे कार्यालयही याठिकाणी आहे. या दोन बंगल्यांना आतून जोडणारा मार्ग आहे. ‘7’ अंकाशी विशेष जुळलेलं नातं – नीतीश कुमार यांना ‘7’ हा अंक विशेष शुभ मानला जातो. त्यांच्या राजकीय प्रवासात या अंकाचा वारंवार उल्लेख दिसतो. 1977 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला, 1987 मध्ये युवा लोकदलचे अध्यक्ष झाले. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या गाडीचा क्रमांक 777 होता. तसेच त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या योजनांना ‘7 निश्चय’ असे नाव दिले असून सध्या ‘7 निश्चय पार्ट-3’वर काम सुरू आहे. Bihar Politics 1 अणे मार्गचा राजकीय वारसा – सध्या नीतीश कुमार 1 अणे मार्ग येथील अधिकृत निवासस्थानी राहत आहेत. मागील सुमारे 19 वर्षांपासून हे ठिकाण बिहारच्या सत्तेचे केंद्र राहिले आहे. याच ठिकाणाहून त्यांनी राज्यकारभाराचे नेतृत्व केले. आता राज्यसभेच्या दिशेने वाटचाल करत 7 सर्क्युलर रोडकडे होणारे त्यांचे स्थलांतर हे बिहारच्या राजकारणातील नव्या भूमिकेचे संकेत मानले जात आहेत.