महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी पुढचं पाऊल; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

Mahadevi Elephant | ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात पाठवण्यासाठी महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त पुनर्विचार याचिका सोमवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे.
महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असे सांगितले होते. त्यासाठी पुढची दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मुंबईत नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनताराची संयुक्त बैठक झाली.
त्यात सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या पुनर्विचार याचिकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Mahadevi Elephant |
आतापर्यंत काय घडलं ?
‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ही हत्तीण नांदणीच्या मठात असतांना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष २०२०मध्ये सुरु झाला. वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणार्या ‘पेटा‘ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीणीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार दिल्ली येथील माजी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीकडे केली. एप्रिल २०२४ मध्ये नांदणी मठाने उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यानंतर उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन २८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथील अंबानी समूहाच्या ‘रिलायन्स फाऊंडेशन’ संचलित ‘वनतारा’ या संगोपन केंद्रात पाठवण्याचा अंतिम निकाल दिला.
नांदणी मठात असलेल्या या हत्तीणीला वनविभाग आणि ‘वनतारा‘च्या कर्मचाऱ्यांनी जामनगरला नेऊन ‘वनतारा’चाच भाग असणाऱ्या ‘राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’च्या ताब्यात सुपूर्द केले. Mahadevi Elephant |
मूक मोर्चा, आंदोलने सुरू
महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्राकडे नेल्यानंतर मूक मोर्चा तसेच आंदोलने सुरू झाली नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेशयात्रा काढल्यानंतर याची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली. त्यानंतर जनभावना लक्षात घेऊन राज्य शासनाबरोबर नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. वनतारानेही सकारात्मक भूमिका घेत नांदणी येथे हत्ती पालन-पोषण सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद मिटला. Mahadevi Elephant |
हेही वाचा :




