मुंबई – 15 जून 2021 पासून आशा व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत राज्य सरकारतर्फे आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सरकार तर्फे देण्यात आला. महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत फेटाळला व भरीव वाढ देण्याचा आग्रह धरला आहे.
राज्य सरकारतर्फे योग्य असा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांनी न दिल्याने संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.
बैठकीस सरकारच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे, अप्पर मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, डॉक्टर रामदास स्वामी, संघटनांच्या वतीने कृती समितीचे एम ए पाटील, डॉक्टर डी एल कराड, भगवानराव देशमुख, राजू देसले, शुभा शमीम, शंकर पुजारी, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग हे उपस्थित होते.