NEET Paper Leak Update : आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार भरपाई; धर्मेंद्र प्रधान मंत्रिमंडळात कायम राहण्याची शक्यता
NEET Paper Leak Update : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात 'नीट' (NEET) पेपरफुटीप्रकरणी देशाभरात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत.

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आंदोलक आणि विरोधी पक्षांकडून राजीनाम्याची मागणी होत असूनही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मंत्रिमंडळात कायम राहण्याची शक्यता आहे. कारण, परीक्षा पेपरफुटीसाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. (NEET Paper Leak Update)
मात्र, नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील आंदोलकांशी गांभीर्याने चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. (NEET Paper Leak Update)
तसेच बैठकीच्या ठिकाणाबाबत सीजेपीने केलेल्या आग्रहावरून मवाळ भूमिका घेणार असल्याचे समजते. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सोमवारी सीजेपीच्या दोन प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि वरिष्ठ सरकारी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा कळवण्याचे आश्वासन दिले आहे. (NEET Paper Leak Update)
त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, प्रधान आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या आहेत. यानंतर सरकारकडून सीजेपीला त्यांच्या मागण्यांवर आणखी एका बैठकीसाठी निरोप पाठवण्यात आला आहे. (NEET Paper Leak Update)
दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे केलेली आहे. (NEET Paper Leak Update)






