Jambut News : शिरूरच्या ‘बेट भागात’ अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन; वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम
Jambut News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर तालुक्यातील बेट भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

Jambut News : शिरूर तालुक्याच्या बेट भागात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. (Jambut News)
बेट भागातील पिंपरखेड, जांबूत, काठापूर खुर्द फाकटे, वडनेर खुर्द, चांडोह आदि गावांतील ग्रामपंचायत, विविध पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी ग्रामस्थांनी अभिवादन करत त्यांना आदरांजली वाहिली. (Jambut News)
बेट भागासह शिरूर तालुक्यातील अनेक गावांत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजच्या जयंतीदिनी वृक्षारोपण, रक्तदान तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (Jambut News)
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबरोबर उत्तर पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात आणि विशेषतः बेट भागातील कृषी, व्यापार, सहकार, आरोग्य, रस्ते, अध्यात्मिक आणि शैक्षणिक जडणघडणीसाठी दादांचे असलेले अमुलाग्र योगदान हा भाग कधीच विसरू शकत नाही, अशा भावना यावेळी फाकटे (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी व्यक्त केल्या. (Jambut News)
प्रसंगी उपस्थितांना दादांच्या आठवणीनी गहिवरून आले. पुणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे अजितदादा हे सर्वसामान्यांचे पालक होते आणि दादांच्या मार्गदर्शनाने राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून बेट भागाचा झपाट्याने झालेला विकास हा दादांच्या आठवणीना जिवंत ठेवणार असल्याची भावना जांबूत विकास सोसायटीचे अध्यक्ष आनंद जगताप यांनी व्यक्त केली. (Jambut News)





