Maharashtra Police : राज्यात पोलिसांचे डिजिटल पेट्रोलिंग; आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Maharashtra Police : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटत असून, महाराष्ट्रातील तरुणाईही सोशल मीडियाद्वारे या आंदोलनाला मोठा पाठिंबा देत आहे.

Maharashtra Police : दिल्लीत नीट पेपरफुटीवरुन सूरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरुन तरुणाई व्यक्त होत असून दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पोलिसांनी डिजिटल पेट्रोलिंग सुरू केल्याची माहिती आहे. (Maharashtra Police)
राज्यातील विविध भागांत सीजेपीच्या पाठिब्यांसाठी झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यावेळी विशेष तयारी केली होती. मुंबई पोलिसांनी तब्बल 14 दिवस सोशल मीडिया मॉनिटरिंग, गुप्त माहिती संकलन आणि प्रत्यक्ष मैदानावरील विशेष नियोजनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. राज्यभरात सीजेपीच्या समर्थनार्थ एकूण 98 ठिकाणी आंदोलने झाल्याची माहिती आहे. (Maharashtra Police)
माहितीनुसार, संभाव्य आंदोलनांची शक्यता लक्षात घेऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिजिटल पेट्रोलिंग केले आहे. आंदोलनाशी संबंधित हॅशटॅग, कीवर्ड्स तसेच सातत्याने पोस्ट करणाऱ्या अकाउंट्सवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. (Maharashtra Police)
आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि त्याचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींच्या ऑनलाइन हालचालींचेही विश्लेषण केले. या डिजिटल मॉनिटरिंगमुळे संभाव्य गर्दी, आंदोलनाची ठिकाणे आणि आयोजकांविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाल्याची माहिती आहे. (Maharashtra Police)
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी तीन स्तरांवर नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यात सोशल मीडिया ट्रेंड्स, ऑनलाइन आयोजक आणि संबंधित हालचालींवर लक्ष ठेवून गुप्त माहिती संकलित करण्यात आली. (Maharashtra Police)
दुसऱ्या टप्प्यात दादर रेल्वे स्थानकासह प्रमुख प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्रांकडे जाणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांमध्ये हलविण्यात आले, जेणेकरून कोणत्याही ठिकाणी मोठा जमाव जमा होऊ नये. (Maharashtra Police)





