Maharashtra Politics : राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आर्णी नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथे मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (Maharashtra Politics)
गेल्या काही महिन्यांपासून अनिल आडे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीपासून पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतून वगळणे आणि योग्य स्थान न देणे, या कारणांमुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Maharashtra Politics)
अनिल आडे हे दिवंगत काँग्रेस नेते रामजीभाऊ आडे यांचे पुत्र आहेत. रामजीभाऊ आडे यांनी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले होते. तसेच अनिल आडे यांच्या पत्नी माधुरी आडे या बंजारा समाजातील पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा राहिल्या असून त्यांनाही काँग्रेसने मोठी संधी दिली होती. त्यामुळे आडे कुटुंबाने काँग्रेस सोडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
आर्णी तालुक्यात अनिल आडे यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव मानला जातो. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती गण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे समर्थक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा आगामी स्थानिक निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, अनिल आडे यांच्या पक्षांतरानंतर आर्णी तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार आणि त्यांच्या जागी पक्षाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. तसेच या पक्षप्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : मोठी बातमी..! भास्कर जाधव भाजपात जाणार?; भाजपा आमदाराची थेट ऑफर






