NED vs SCO : नेदरलँड्सचा ऐतिहासिक विजय; स्कॉटलंडचा धुव्वा उडवत मोडला भारताचा १२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

जॉर्ज मुनसेने साकारली १९१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी –
या सामन्याच्या पहिल्या डावात स्कॉटलंडच्या जॉर्ज मुनसेने १५० चेंडूंमध्ये १४ चौकार आणि ११ षटकार मारत १९१ धावांची शानदार खेळी केली. त्याला मॅथ्यू क्रॉसने उत्तम साथ दिली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी केली. या जोरावर स्कॉटलंडने ५० षटकांत ३६९ धावांची मोठी धावसंख्या उभारली, ज्यापैकी १९१ धावा एकट्या मुनसेच्या होत्या.
नेदरलँड्सने ४ चेंडू बाकी ठेवून जिंकला सामना –
The Netherlands edge past Scotland in an exhibition of power-hitting 😲#CWCL2https://t.co/azfINh2owj
— ICC (@ICC) June 13, 2025
ओ’डॉडने शेवटपर्यंत दमदार फलंदाजी केली. त्याने १३० चेंडू खेळत ४ षटकार आणि १३ चौकार मारले आणि १५८ धावा काढल्या. त्याला नोआ क्रोसने चांगली साथ दिली, ज्याने २९ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. नेदरलँड्सने दिलेले आव्हान शेवटच्या षटकात ४ चेंडू बाकी ठेवून पूर्ण केले.
हेही वाचा – Babar Azam : बाबरची बॅट आगामी बिग बॅश लीगध्ये गरजणार! ‘या’ संघाने केले करारबद्ध
नेदरलँड्सने भारत आणि इंग्लंडला टाकले मागे –
नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ३०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून मोठी कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक विजयासह नेदरलँड्सने भारत आणि इंग्लंड या दोन्ही दिग्गज संघांचे विक्रम मोडीत काढले. यापूर्वी इंग्लंडने वेस्टइंडिजविरुद्ध ३६१ धावांचा पाठलाग ६ गडी राखून पूर्ण केला होता. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरी खेळताना ३७० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.





