Babar Azam : बाबरची बॅट आगामी बिग बॅश लीगध्ये गरजणार! ‘या’ संघाने केले करारबद्ध

Babar Azam join Sydney Sixers team for BBL 2025 : बाबर आझमचे जगभरात चाहते आहेत आणि तो जगातील सर्वोत्तम टी-२० खेळाडूंमध्ये गणला जातो. आता त्याला बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी प्री-ड्राफ्टद्वारे सिडनी सिक्सर्स संघाने करारबद्ध केले आहे. ज्यामुळे तो सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण बाबर पहिल्यांदाच बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. शाहीन आफ्रिदी, शादाब खान, हारिस रौफ आणि मोहम्मद रिझवान हे बीबीएलच्या पुढील हंगामात खेळणार आहेत.
बाबर आझमने स्वत: दिली माहिती –
बीबीएलमध्ये खेळण्याबद्दल बाबर आझम म्हणाला की, ‘जगातील सर्वोत्तम टी-२० लीगपैकी एकामध्ये खेळणे आणि अशा यशस्वी फ्रँचायझीचा भाग होणे ही एक रोमांचक संधी आहे. मी संघाच्या यशात योगदान देण्यास, चाहत्यांशी एक मजबूत संबंध निर्माण करण्यास आणि हा अनुभव पाकिस्तानमधील माझे मित्र, कुटुंब आणि समर्थकांसह शेअर करण्यास उत्सुक आहे.’
बाबरला जगातील विविध लीगमध्ये खेळण्याचा अनुभव –
Babar Azam is coming for #BBL15#BabarAzam pic.twitter.com/QGLFZ7tfQn
— Fourth Umpire (@UmpireFourth) June 13, 2025
बाबर आझमने जगभरातील टी-२० लीगमध्ये क्रिकेट खेळले आहे. त्याने कॅरिबियन प्रीमियर लीग, लंका प्रीमियर लीग आणि इंग्लंडमध्ये व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये क्रिकेट खेळले आहे. सिडनी सिक्सर्सच्या महाव्यवस्थापक राहेल हेन्स म्हणाल्या की बाबरचा बायोडाटा स्वतःच बोलतो. त्याने आणलेले कौशल्य आणि अनुभव आमच्या खेळाडू गटासाठी खूप मौल्यवान आहेत आणि ही बातमी आमच्या चाहत्यांसाठी रोमांचक आहे.
हेही वाचा – WTC Final 2025 : पॅट कमिन्सचा मोठा धमाका! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच कर्णधार
बाबर आझम पाकिस्तानी संघाचा राहिलाय कर्णधार –
Great News #BabarAzam in #BBL pic.twitter.com/VQGN5JTSvK
— Sohail Imran (@sohailimrangeo) June 13, 2025
बाबर आझमला टी-२० क्रिकेटमध्ये भरपूर अनुभव आहे, जो सिडनी सिक्सर्स संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. तो पाकिस्तान राष्ट्रीय संघ आणि पीएसएलमधील शावर झल्मीचा कर्णधार राहिला आहे. त्याने टी-२० क्रिकेटच्या ३२० सामन्यांमध्ये एकूण ११३३० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ११ शतके आणि ९३ अर्धशतके झाली आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १२२ धावा आहे.





