ICC Annual Rankings : भारताचे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये वर्चस्व कायम, कसोटीत फटका

ICC Annual Rankings Announce : आयसीसीने तिन्ही फॉरमॅटची वार्षिक वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतासाठी आनंद आणि दुःख दोन्ही आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये फटका बसला आहे. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अव्वल स्थानावर राहिला. तर कसोटीत भारतीय संघ आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. वार्षिक कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या या अपडेटमध्ये, मे २०२४ नंतर खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना १०० टक्के आणि गेल्या दोन वर्षातील सामन्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे आता क्रमवारी अलीकडील कामगिरीवर आधारित बनले आहे, ज्यामुळे ते अधिक अचूक आणि अद्ययावत झाले आहेत.
From Test dominance to ODI and T20I brilliance, the updated ICC Men’s Team Rankings showcase outstanding cricketing feats 🤩 https://t.co/IVTyPOyLyE
— ICC (@ICC) May 5, 2025
एकदिवसीय क्रमवारीत वर्चस्व कायम –
२०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भारताने आपले स्थान मजबूत केले आहे. त्याचबरोबर १२२ वरून १२४ रेटिंग गुणांवर पोहोचला. यासह, भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपविजेता संघ न्यूझीलंड आता या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
हेही वाचा – Shivalik Sharma : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूवर बलात्काराचा आरोप, जोधपूर पोलिसांनी केली अटक
टी-२० मध्येही वर्चस्व कायम –
भारताने सर्वात लहान फॉर्मेटमध्येही आपले स्थान मजबूत केले आहे आणि टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. तथापि, ऑस्ट्रेलियावरील त्यांची आघाडी आता फक्त ९ गुणांवर आली आहे. २०२२ मध्ये टी-२० चॅम्पियन झाल्यानंतरही इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने पाकिस्तानला मागे टाकत सातवे स्थान पटकावले आहे, तर बांगलादेश आणि अफगाणिस्तान अनुक्रमे नववे आणि दहावे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा – PBKS vs LSG : अर्शदीप-प्रभसिमरनच्या वादळाने केली लखनौची वाताहत, पंजाबने नोंदवला सातवा विजय
कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण –
ऑस्ट्रेलियाने कसोटीत वर्चस्व राखले आहे, जरी त्यांची आघाडी आता १५ वरून १३ गुणांवर आली आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने शानदार कामगिरी केली आहे आणि दक्षिण आफ्रिका आणि भारताला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघही भारताच्या पुढे गेला आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. मात्र, न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांनी अनुक्रमे आपले स्थान कायम राखले आहे.





