Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का! नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध; नगरसेवकपद धोक्यात
Maharashtra Politics : सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मिरज येथील प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेविका अश्विनी कोळी यांचे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरवत पुणे विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने ते तात्काळ रद्द व जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (Maharashtra Politics)
समितीच्या आदेशाची प्रत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे. या निर्णयानंतर अश्विनी कोळी यांच्या नगरसेवकपदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. (Maharashtra Politics)
महापालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक २० हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार म्हणून अश्विनी कोळी यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार विकास सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता. (Maharashtra Politics)
दरम्यान, माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी अश्विनी कोळी यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेत पुणे येथील जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची अनेक महिन्यांपासून सुनावणी आणि कागदपत्रांची तपासणी सुरू होती. (Maharashtra Politics)
सादर करण्यात आलेले पुरावे आणि कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर समितीने अश्विनी दत्तात्रय कांबळे (सध्याचे नाव अश्विनी कोळी) यांचा ‘कोळी महादेव’ अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरवला. तसेच उपविभागीय अधिकारी, पंढरपूर यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेले जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश दिले. (Maharashtra Politics)
या निर्णयानंतर महापालिका प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, नगरसेविका अश्विनी कोळी यांच्या नगरसेवकपदाबाबत अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणाकडून घेतला जाणार आहे. (Maharashtra Politics)






