Maharashtra Politics : लवकरच मोठा राजकीय भूकंप? जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक
Maharashtra Politics : आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे आगामी काळात मोठी राजकीय उलथापालध होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’नंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी काळात ठाकरे गटातील काही आमदार शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होतील अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे आगामी काळात मोठी राजकीय उलथापालध होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी भेट झाल्याची बातमी एका न्यूज वाहिनीच्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Maharashtra Politics)
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाला कोणत्या स्वरूपाची भूमिका आणि जबाबदारी मिळू शकते, याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील आणखी एका वरिष्ठ नेत्याशीही स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण (Maharashtra Politics)
सत्तेत सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाल्यास पक्षाची पुढील भूमिका काय असावी, यावरही विचारमंथन झाल्याचे समजते. या भेटीबाबत जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांची भेट झाल्याचे मान्य केले. मात्र, ही केवळ अनौपचारिक भेट होती आणि कोणताही राजकीय निर्णय किंवा ठोस चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. दोन्ही गट एकत्र आल्यास ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत राहतील की इंडिया आघाडीसोबत, हा प्रश्न कायम चर्चेत होता. मात्र, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्या चर्चांवर पडदा पडला आहे. मात्र, अधून मधून ही चर्चा होतच असते. (Maharashtra Politics)
आता जयंत पाटील–विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





