Khadakwasla Dam : पुणेकरांची चिंता मिटली! खडकवासला प्रकल्पात ८१ टक्के पाणीसाठा; धरणांमधून विसर्ग सुरू
Khadakwasla Dam : एल निनोचे सावट आणि महिनाभर लांबणीवर पडलेल्या पावसामुळे पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले होते.

Khadakwasla Dam : एल निओचे संकट, महिनाभर लांबणीवर पडलेला पाऊस, धरणात शिल्लक राहिलेला अल्प पाणीसाठा अशा परिस्थितीमुळे शहरात पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यामुळे यंदा खडकवासला प्रकल्पातील धरणे भरणार की नाही, अशी भिती व्यक्त होत होती. (Khadakwasla Dam)
मात्र या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला असून प्रकल्पात एकूण पाणीसाठा २३.४२ टीएमसी म्हणजे ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Khadakwasla Dam)
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. खडकवासला धरणात गुरुवारी रात्री २९ मिमी इतका पाऊस पडला. तर पानशेत धरणात १०८मिमी, वरसगाव धरणात १०३ मिमी आणि टेमघर धरणात १७७ मिमी इतक्या पावसाची नोंद रात्रभरात झाली आहे. त्यानंतर शुक्र्वारी दिवसभरात खडकवासला धरणात १२ मिमी, पानशेत ४५ मिमी, वरसगाव धरणात ४३ मिमी, टेमघर धरणात ५५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. (Khadakwasla Dam)
खडकवासला धरणातून विसर्ग सुरुच
खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. मागील २४ तासात खडकवासला धरणात ४१ मिमी पाऊस पडला. काल खडकवासला धरण पुन्हा १०० टक्के भरल्याने धरणातून सुमारे ३ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला होता. (Khadakwasla Dam)
त्यामध्ये गुरुवारी रात्री पुन्हा वाढ करत सुमारे ९ हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला त्यानंतर दुपारनंतर विसर्गामध्ये वाढ करत ९ हजार ३७२ क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला. (Khadakwasla Dam)
खडकवासला धरणात ५०९ मिमी इतका पाऊस
खडकवासला धरणात १ जून ते २४ जुलै २०२६ पर्यंत ५०९ मिमी इतका पाऊस पडला आहे. याच कालावधीत टेमघर धरणात १ हजार ९१० मिमी , पानशेत धरणात १ हजार ४११ मिमी आणि वरसगाव धरणात १ हजार ३५३ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. (Khadakwasla Dam)
यंदा आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा टेमघर धरणात पडला आहे. एकंदर मागील वर्षी म्हणजे दि.१ जून ते दि.२४ जुलै २०२५ या कालावधीत पडलेल्या पावसाची तुलना करता यंदा जादा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. (Khadakwasla Dam)
मागील वर्षी याच कालावधीत खडकवासला धरणात ४३० मिमी, टेमघर धरणात १ हजार ९०३ मिमी, पानशेत धरणात १ हजार २०३ मिमी आणि वरसगाव धरणात १ हजार २०६ मिमी इतका पाऊस पडला होता. या आकडेवारी यंदा कमी कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत जादा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. (Khadakwasla Dam)
धरणाचे नाव – पाणीसाठा- टक्के
- खडकवासला – १.९७ टीएमसी – १०० टक्के
- पानशेत – ९.०४ टीएमसी – ८४.९७ टक्के
- वरसगाव – १०.०६ टीएमसी – ७८.७५ टक्के
- टेमघर – २.३५ टीएमसी – ६३.४४ टक्के
धरणात मागील वर्षी इतका पाणीसाठा
खडकवासला प्रकल्पात मागील वर्षी म्हणजे दि.२४ जुलै २०२५ रोजी २३.६० टीएमसी अर्थात ८०.९८ टक्के होता. यंदा पाऊस उशीरा जरी सुरु झाला असला तरी कमी दिवसात जास्त पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. तळाशी गेलेला पाणीसाठा अवघ्या २० दिवसात ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Khadakwasla Dam)
Khadakwasla Dam: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! खडकवासला धरणात गेल्या वर्षापेक्षा ५.६१ टीएमसी कमी
Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत १७ टीएमसी पाणीसाठा असताना पाणीकपात कशासाठी?






