लोणी देवकर, (वार्ताहर) – राष्ट्रीय चर्मकार महासंघ या अराजकीय सामाजिक संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नवनाथ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी त्यांना नियुक्त पत्र दिले.
शेवाळे हे गेल्या २२ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी इंदापूर तालुकाध्यक्ष, पुणे जिल्हा उपाध्यक्ष,राज्य कार्यकारिणी सदस्य आणि युवक प्रदेश उपाध्यक्ष अशी पदे सांभाळली आहेत. या निवडीबद्दल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी कार्याची पावती देत आपल्यावर सोपवलेले जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रभातशी बोलताना सांगितले.