Police Transfer : राज्यातील 10 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे लागली वर्णी?
Police Transfer : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय स्तरावर एक मोठी उलथापालथ झाली आहे.

Police Transfer : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले असून 10 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (29 जून) जारी करण्यात आले. (Police Transfer)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 22 न (2) अंतर्गत जनहित आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मंजुरीनंतर हे आदेश लागू करण्यात आले. (Police Transfer)
या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या
- देविदास प्रभाकर कठाळे (सानपाडा पोलीस ठाणे) यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती.
- दीपक विजय सुर्वे (न्हावाशेवा पोलीस ठाणे) यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली.
- सुनील आनंदा वाघमारे (रबाळे एमआयडीसी) यांची एनआरआय पोलीस ठाण्यात नियुक्ती.
- दिपाली राहुल पाटील (खारघर पोलीस ठाणे) यांची उरण पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली.
गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनाही नवी जबाबदारी
- सुरज ज्ञानदेव पाटील, जे सायबर विमानतळ पोलीस ठाण्यात तात्पुरते संलग्न होते, त्यांची खारघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली.
- पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे (गुन्हे शाखा) यांच्याकडे न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
- ज्योती बाळासाहेब देशमुख (गुन्हे शाखा) यांची कामोठे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती.
- बाळा रघुनाथ कुंभार (गुन्हे शाखा) यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती.
- वाहतूक आणि एएचटीयू विभागातही फेरबदल
- गजानन शंकर कदम (तुर्भे पोलीस ठाणे) यांची गुन्हे शाखेच्या एएचटीयू विभागात बदली करण्यात आली.
- चेतनाराज चौधरी (गुन्हे शाखा) यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या बदल्यांमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजात नव्या जबाबदाऱ्यांसह फेररचना करण्यात आली आहे. (Police Transfer)
IAS Transferred : राज्यातील 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय






