IPS Transferred : मोठी उलथापालथ..! राज्यातील १२ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे पाटलांवर मोठी जबाबदारी
IPS Transferred : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वारे वाहत असतानाच, महायुती सरकारने प्रशासकीय बदल्यांचा धडाका कायम ठेवला आहे.

IPS Transferred : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानही महायुती सरकारकडून प्रशासकीय बदल्यांचा धडाका कायम असून, गृहविभागाने मंगळवारी १२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या फेरबदलांमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (IPS Transferred)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान नागपूर पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांची बदली करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (IPS Transferred)
IAS Transferred : राज्यातील 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ५२ आयपीएस आणि ४४ राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू असून, महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या केल्या जात आहेत. (IPS Transferred)
बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे
प्रशांत मोहिते – पोलीस उपआयुक्त, डायल 112, नवी मुंबई
निलभ रोहन – पोलीस अधीक्षक, नांदेड
अभिनाश कुमार – पोलीस उपआयुक्त, पुणे शहर
श्रेणिक लोढा – पोलीस अधीक्षक, हिंगोली
रुपाली अंबुरे – पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
शशिकांत सातव – पोलीस उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर
रमेश धुमाळ – पोलीस उपआयुक्त, नागपूर शहर
पीयूष जगताप – अपर पोलीस अधीक्षक, खामगाव
नारायण शिरगांवकर – समादेशक, एसआरपीएफ गट क्र. 19, अहिल्यानगर
प्रांजली सोनावणे – पोलीस उपआयुक्त, अमरावती शहर
IPS Transfer : मुंबई पोलीस दलात मोठे बदल.! 6 धडाकेबाज IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
IAS Transferred : राज्यातील 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय






