केडगाव – देऊळगावगाडा येथील दत्त संस्थान-नारायण महाराज बेट (ता. दौंड) येथे बुधवार (दि. 24) ते शुक्रवार (दि. 26) या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यात 1 हजार 111 सत्यनारायण महापूजासह दत्तयाग सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सदगुरू नारायण महाराजयांनी 1908 मध्ये दत्त संस्थान स्थापनकरत धर्म प्रसाराचे काम सुरू केले. तेव्हापासून नारायण बेट येथे नियमितपणे धार्मिक विधी, साधना सुरू असतात. बुधवार ते शुक्रवार दरम्यान तीन दिवसीय दिव्य धर्मयज्ञ पार पडणार आहे. यामध्ये बुधवारी (दि. 24) 108 सत्यदत्त पूजा, गुरुवारी (दि. 25) 1 हजार 111 सत्यनारायण पूजा तर शुक्रवारी (दि. 26) नारायण महाराजांच्या 138 व्याजयंती दिनी अत्यंत भव्य, असा सहस्त्रकुंडी 1 हजार 111 दत्तयाग सोहळा सकाळी 9 ते 12 या काळात पार पडणार आहे.
नारायण महाराजांच्या समाधी स्थळीजन्मोत्सवाचे कीर्तन आणि जन्मोत्सव होणार आहे. महाराजांनी 1933 मध्ये 1 हजार 108 श्री सत्यनारायण पूजांचे आयोजन केले होते. त्यानंतर तब्बल 90 वर्षांनी हो सोहळा होत आहे, अशी माहिती देवसंस्थाच्या वतीने देण्यात आली.