Nagpur accident: काँग्रेस खासदाराच्या कारचा नागपूरमध्ये अपघात; ट्रकच्या धडकेत गाडीचा चक्काचूर
Nagpur accident: सुदैवाने या अपघातातून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले असून ते किरकोळ जखमी झाले.

Nagpur accident: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याकरिता सोमवारी पहाटे खासदार प्रशांत पडोळे हे सुरक्षारक्षक आणि चालकासह पहाटे नागपूर एअरपोर्टकडे निघाले होते. त्यावेळी नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. Nagpur accident
ट्रकने दिलेल्या या धडकेनंतर प्रशांत पडोळे यांच्या कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातातून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले असून ते किरकोळ जखमी झाले. Nagpur accident
हेही वाचा:
Katraj Tunnel Murder : प्रियकराचे क्रूर पाऊल! प्रेमसंबंध तोडल्याचा असा घेतला बदला; आरोपीला बेड्या






