Bribery Case : मोठी कारवाई! सहाय्यक आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडलं; राज्यात खळबळ
Bribery Case : महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

Bribery Case : भिवंडी महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत प्रभाग समिती क्रमांक ३ चे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. (Bribery Case)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग समिती क्रमांक ३ च्या हद्दीत सुरू असलेल्या एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी सुरेंद्र भोईर यांनी संबंधितांकडे ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यातील पहिला हप्ता म्हणून २ लाख ५० हजार रुपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली होती. (Bribery Case)
याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास प्रभाग समिती कार्यालयाबाहेरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या स्वतःच्या कारमध्ये भोईर यांनी अडीच लाखांची रक्कम स्वीकारताच एसीबीने त्यांना रंगेहात पकडले. (Bribery Case)

Bribery Case : मोठी कारवाई! सहाय्यक आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडलं; राज्यात खळबळ
कारवाईनंतर सुरेंद्र भोईर यांना शहर पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पहाटे अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Bribery Case)
दरम्यान, भिवंडी महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षांत लाचखोरीच्या चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Bribery Case)
मात्र अशा प्रकरणांतील कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई होत नसल्याची टीका होत असून, त्यांना पुन्हा जबाबदारीच्या पदांवर नियुक्त केल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या ताज्या कारवाईमुळे भिवंडी महानगरपालिकेतील कारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Bribery Case)





