Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा नव्या वादात अडकणार? ‘हे’ प्रकरण अंगलट येणार?
Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एका नव्या वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परळी येथे मराठा भवनासाठी देण्यात आलेल्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Dhananjay Munde)
श्री दत्त देवस्थान थोरले देवघर संस्थानचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी आरोप केला आहे की, मराठा भवनासाठी देण्यात आलेली 28 गुंठे जमीन ही संस्थानच्या मालकीची असून तिचा बेकायदेशीरपणे ताबा देण्यात आला. या प्रकरणी मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. (Dhananjay Munde)
मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी परळी येथे धनंजय मुंडे यांच्या हस्ते मराठा भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी संबंधित जागा मराठा भवनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही जमीन श्री दत्त देवस्थान संस्थानच्या मालकीची असल्याचा दावा संस्थानने केला आहे. (Dhananjay Munde)
या संदर्भात संस्थानने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत जमीन मालकीची कागदपत्रेही जोडली आहेत. वर्ग-2 इनामी जमीन असलेल्या या जागेचा संगनमताने आणि कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. (Dhananjay Munde)
संस्थानच्या वतीने परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, आमदार धनंजय मुंडे आणि इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा आणि हायकोर्टात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (Dhananjay Munde)
या आरोपांमुळे बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आता प्रशासन आणि संबंधित पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Dhananjay Munde)





