Maharashtra Politicse : मोठी घडामोड..! ठाकरे गटाचे सात खासदार फुटणार, केंद्रात मंत्रिपद फिक्स? संजय राऊतांच सूचक विधान
Maharashtra Politicse : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या संभाव्य बंडाची आणि राजकीय उलथापालथीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politicse : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. ठाकरे गटाचे तब्बल सात खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तांमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politicse)
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही खासदारांशी संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politicse)
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील नऊ खासदारांपैकी सात खासदार शिंदे गटात जाण्यास इच्छुक असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातील एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र या वृत्तांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. (Maharashtra Politicse)
दरम्यान, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. “यावर प्रश्न विचारू नका, मौनं सर्वार्थ साधनम्,” असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Maharashtra Politicse)
मात्र ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या सर्व चर्चांना पक्षाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार भाजप किंवा शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. (Maharashtra Politicse)
“९ पैकी १० किंवा ११ खासदार फुटणार अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण यात कोणतेही तथ्य नाही. ज्यांना पक्ष सोडायचा होता ते आधीच गेले आहेत. उर्वरित सर्व खासदार पक्षासोबत ठामपणे उभे आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politicse)
यामुळे ठाकरे गटातील कथित फूट आणि खासदारांच्या नाराजीबाबतच्या चर्चांना आणखी रंग चढला असून, आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politicse)





