Building Collapse : मोठी दुर्घटना..! ३ मजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू, मानखुर्द परिसरातील घटना
Building Collapse : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या हाहाकारादरम्यान रविवारी (५ जुलै) रात्री मानखुर्द परिसरात एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे.

Building Collapse : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान रविवारी रात्री मानखुर्द परिसरात मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Building Collapse)
ही दुर्घटना रविवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास मानखुर्द येथील हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात घडली. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. (Building Collapse)
बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून सहा जणांना बाहेर काढले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात, तर एका मृतदेहाला राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (Building Collapse)
या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. (Building Collapse)
दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटना घडल्या आहेत. रविवारी कुर्ला आणि गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात झाड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. (Building Collapse)
यापूर्वी चेंबूरमध्ये झाड पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला, तर साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मानखुर्दमधील या दुर्घटनेनंतर मुंबईत पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा १० वर पोहोचला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Building Collapse)
Heavy Rainfall: खेड तालुक्यात मुसळधार पाऊस; चिंबळी, कुरुळी परिसराचा वीजपुरवठा पहाटेपासून खंडित
Mumbai Rain Update : पावसाचा अलर्ट! खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे






