Rohit Sharma : रोहित केकेआरमध्ये जाणार? अभिषेक नायर KKR चा कोच झाल्यानंतर MI ची क्रिप्टिक ‘ती’ पोस्ट चर्चेत

Mumbai Indians cryptic post for Rohit Sharma : आयपीएलचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये खेळवला जाईल आणि त्यासाठी खेळाडूंचा लिलाव या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली असून, कोलकाता नाइट रायडर्सने महत्त्वाचा बदल करत अभिषेक नायरची मुख्य प्रशिक्षकम्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी नायर केकेआरसाठी सहायक म्हणून काम करत होता. आता सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सने एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी रोहित शर्माचा फोटो वापरला आहे.
रोहित शर्मा केकेआरमध्ये जाणार?
रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. नायरला केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केल्याची चर्चा आधीपासूनच होती, तसेच अशा बातम्याही समोर येत होत्या की रोहित शर्मा आयपीएल 2026 मध्ये केकेआरकडून खेळू शकतो. याच अटकळांदरम्यान नायरच्या नियुक्तीनंतर मुंबई इंडियन्सने केलेला ही क्रिप्टिक पोस्ट महत्त्वाची ठरते.
मुंबई इंडियन्सने नक्की पोस्टमध्ये काय म्हटले?
𝗦𝘂𝗻 𝘄𝗶𝗹𝗹 𝗿𝗶𝘀𝗲 𝘁𝗼𝗺𝗼𝗿𝗿𝗼𝘄 𝗮𝗴𝗮𝗶𝗻 ye toh confirm hai, but at (K)night… मुश्किल ही नहीं, नामुमकिन है! 💙 pic.twitter.com/E5yH3abB4g
— Mumbai Indians (@mipaltan) October 30, 2025
यापूर्वी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी रोहितने नायरच्या देखरेखीखाली मुंबईत फलंदाजीचा सराव केला होता. अभिषेक नायर केकेआरचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर रोहित शर्माचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेल हे निश्चित आहे, पण नाईटमध्ये हे (रोहित शर्माला खेळवणे) केवळ ‘मुश्किल’च नाही, तर ‘नामुमकिन’ आहे!”
मुंबई इंडियन्सच्या या पोस्टवरून हे स्पष्ट होते की, त्यांनी रोहित शर्मा दुसऱ्या कोणत्याही फ्रँचायझीकडून खेळण्याच्या अटकळांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग राहील, असा संदेश त्यांनी दिला आहे.





