MS Dhoni : ‘सर, तुम्हाला खेळावेच लागेल…!’, IPL 2026 खेळण्याबद्दल चाहत्याच्या प्रश्नावर धोनीने काय दिले उत्तर? पाहा VIDEO

MS Dhoni latest video : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 अजून सात महिने लांब आहे, पण चाहत्यांमध्ये एक सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे धोनी पुढील हंगामात मैदानात खेळणार का? चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी दीर्घकाळ खेळणारा धोनी गेल्या काही हंगामांपासून गुडघ्यांच्या दुखापतीशी झुंजत आहे. तरीही त्याने नेहमीच संघाला प्राधान्य दिले आहे. आयपीएल 2025 मध्ये CSK तळाच्या स्थानावर राहिल्याने धोनीच्या भविष्याबाबत चर्चा आणखी तीव्र झाली आहे. अशात आता त्याचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे.
डिसेंबरपर्यंत विचार करेन –
एमएस धोनीचा हा नवीन व्हिडीओ चेन्नईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातील आहे. ज्यामध्ये धोनीने आपल्या योजनांबाबत खुलासा केला आहे. धोनी म्हणाला, “मला खेळायचे आहे की नाही, हे माहित नाही. माझ्याकडे अजून वेळ आहे. डिसेंबरपर्यंत विचार करेन, दोन-तीन महिने घेईन आणि मग निर्णय घेईन.”
Fans shouting u have to play sir
MS Dhoni : Who will take care of knee pain and smile 😃 pic.twitter.com/v1Msz9yval
— Yash MSdian ™️ 🦁 (@itzyash07) August 10, 2025
यावेळी प्रेक्षकांध्ये बसलेला एक चाहता ओरडून म्हणाला, “सर, तुम्ही खेळायलाच हवे!” यावर धोनी हसत म्हणाला, “अरे, गुडघ्यांमधील वेदनांचे काय? त्याची काळजी कोण घेणार?” या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे चाहते धोनीच्या खेळण्याबाबत संभ्रमात आहेत.
आयपीएल 2025 मध्ये धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारले –
आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सला हरवून शेवटचे जेतेपद पटकावले होते. यानंतर मुंबईत धोनीच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याच्या फलंदाजीच्या क्रमात घसरण आणि धावण्याच्या गतीवर परिणाम दिसून आला. आयपीएल 2025 मध्ये ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर धोनीने पुन्हा सीएसकेचे कर्णधारपद स्वीकारले, पण संघाला सलग पराभवांपासून वाचवता आले नाही.
सीएसकेची रणनीती आणि अश्विनचा नवा प्रवास –
दरम्यान, धोनी आणि ऋतुराज यांनी नुकतीच चेन्नईत सीएसके अधिकाऱ्यांसोबत आयपीएल 2026 साठी रणनीतीवर चर्चा केली. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन सीएसकेला सोडून नव्या फ्रेंचायझीच्या शोधात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचबरोबर धोनी खेळणार की नाही, याबाबत चाहते उत्सुक आहेत. त्याचा निर्णय सीएसके आणि आयपीएलच्या भविष्यावर मोठा परिणाम करेल.





