National Sports Bill : भारताच्या क्रीडा क्षेत्रात क्रांती! राष्ट्रीय क्रीडा प्रशासन आणि डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

National Sports Bill Pass in Lok Sabha : केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत ‘राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक’ आणि ‘राष्ट्रीय डोपिंगविरोधी सुधारणा विधेयक २०२५’ यशस्वीपणे पारित केले. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ही दोन्ही विधेयके सादर केली होती. ही दोन्ही विधेयक काय आहेत? जाणून घेऊया.
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक –
या विधेयकाचा उद्देश भारतातील विविध क्रीडा प्रशासकीय संस्थांचे नियमन करणे आहे. याअंतर्गत ‘नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड (एनएसबी)’ स्थापन केले जाईल, जे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)सह सर्व क्रीडा महासंघांवर देखरेख ठेवेल.
राष्ट्रीय डोपिंगविरोधी सुधारणा विधेयक २०२५ –
पिछली सरकारों की आंतरिक राजनीति के कारण दशकों तक लटका रहा National Sports Governance Bill. pic.twitter.com/mxPMRKaUTj
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 11, 2025
हे विधेयक राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेला (नाडा) जागतिक डोपिंगविरोधी संस्थेच्या (वाडा) मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिक ‘संचालन स्वातंत्र्य’ प्रदान करते. या विधेयकामुळे नाडा आणि राष्ट्रीय डोपिंगविरोधी अपील पॅनेलला संचालन, तपास आणि अंमलबजावणीच्या निर्णयांमध्ये पूर्ण स्वायत्तता मिळेल.
स्वातंत्र्यानंतर क्रीडा प्रशासनातील सर्वात मोठी सुधारणा – क्रीडा मंत्री
भारत में अंतर्राष्ट्रीय स्तर का खेल इकोसिस्टम बनाने के लिए ‘National Sports Governance Bill’ अति महत्वपूर्ण… pic.twitter.com/eeo377uVOr
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 11, 2025
लोकसभेत या विधेयकांवर बोलताना क्रीडा मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “खेळ हा आपल्या देशासाठी नवीन विषय नाही. आपला देश शतकांपासून खेळांमध्ये सक्रिय आहे. देशातील युवा ही आपली ताकद आहे. आम्हाला खेळाडूंनी देश-विदेशात उत्कृष्ट कामगिरी करुन पदके जिंकावीत आणि तिरंग्याचा गौरव वाढवावा अशी अपेक्षा आहे. हे विधेयक स्वातंत्र्यानंतर क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी सुधारणा ठरेल. यामुळे ‘ग्राउंड टू ग्लोरी’ हे स्वप्न साकार होईल.”
हेही वाचा – Glenn Maxwell : मॅक्सवेलने घेतला सूर्यासारखा थक्क करणारा झेल, हवेत उडी अन् विजयाचा थरार! पाहा VIDEO
तसेच क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाचाही उल्लेख केला. देशभरातील ‘खेलो इंडिया सेंटर्स’मधून खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जात आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी सर्व सुविधा आणि प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





