Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे नेमके कोणासोबत? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? सर्वात मोठी माहिती समोर
Omraje Nimbalkar : शिवसेना ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चा आणि पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याच्या निकालानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Omraje Nimbalkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित बंडानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर त्यांनी अद्याप कोणताही पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले असतानाच, शिवसेना (शिंदे गट) नेते नाना भानगिरे यांनी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Omraje Nimbalkar)
न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी अजून कोणताही पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलेला नाही. आधी मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी चर्चा करेन. त्यानंतरच माझी राजकीय भूमिका जाहीर करेन. निकालाचा आणि पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नाही.” या वक्तव्यानंतर त्यांच्या पुढील निर्णयाबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. (Omraje Nimbalkar)
Maharashtra Politics : ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराला पहिला झटका; कार्यकर्ते आक्रमक
नाना भानगिरे यांनी घेतली भेट
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी ओमराजे निंबाळकर यांची पुण्यात भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी सांगितले, “पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. ओमराजे आता मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले आहे.” भानगिरे यांच्या या वक्तव्यामुळे ओमराजे अखेरीस शिंदे गटात जाणार का, याबाबतच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. (Omraje Nimbalkar)
अधिकृत घोषणा अद्याप नाही
राजकीय चर्चांना वेग आला असला तरी ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ते अखेरीस शिंदे गटात जातील की ठाकरे गटातच कायम राहतील, याबाबतची स्पष्टता अद्याप आलेली नाही. (Omraje Nimbalkar)
ठाकरेंचीही रणनीती बदलली
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीही संघटनात्मक हालचालींना वेग दिल्याची चर्चा आहे. बंडाची चर्चा झालेल्या मतदारसंघांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगितले जात आहे. आता ओमराजे निंबाळकर यांचा अंतिम निर्णय आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले आहे. (Omraje Nimbalkar)






