Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार की नाही? निकालानंतर केलेल्या विधानाने संभ्रम निर्माण
Omraje Nimbalkar : पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Omraje Nimbalkar :‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटाचे सहा खासदार सामील झाल्याची चर्चा होत आहे. यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल 20 वर्षानंतर देण्यात आल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
या खटल्यात पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल विरोधात गेल्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सध्या कलियुग आहे, असे म्हंटले.
तर शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चांबाबतही त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ओमराजे म्हणाले की, “शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि हा निर्णय घेईन. या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय याचा संबंध नाही. सध्या कलियुग आहे,” असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. (Omraje Nimbalkar)

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार की नाही? निकालानंतर केलेल्या विधानाने संभ्रम निर्माण
पुढे ते म्हणाले, “या खटल्याच्या निकालासाठी 20 वर्षांचा मोठा कालावधी गेला, त्यानंतर असा निर्णय येणे हे दुर्दैवी आहे. कोर्टाने राजकीय वैमनस्य होत हे मान्य केले. सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पोलिसांच्या तपासात त्रुटी होती, ही वस्तुस्थिती आहे, कारण पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती, हा तपास सीबीयाकडे द्या. (Omraje Nimbalkar)
नंतर सीबीआयने तपास केला, मात्र मध्ये तीन वर्षे गेली. वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे, राजकीय वैमनस्य असल्याचे कोर्टाने मान्य केले, मग हत्या कोणी केली?” असा सवाल सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्याचे निश्चित मानले जात होते. त्यांच्या प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. मात्र, आता ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याने ते शिंदे गटात जाणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
हेही वाचा:
Pawanraje Nimbalkar Case: ओमराजे निंबाळकरांना धक्का! पवनराजे प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता





