पवनानगर (वार्ताहर) – पवन मावळ हा निसर्ग सौंदर्य नटलेली परिसर असून या भागात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र येथील रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात कामशेत पवनानगर रस्त्यावर येळसे गावाच्या हद्दीतील शेवती वसाहत येथे एका बाजूला सिंमेट काँक्रीटीकरण केले आहे तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर खडी टाकुन ठेवली आहे.
यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कामशेत पवनानगर रस्त्यावर काम सुरू असल्याबाबत आवश्यक त्या ठिकाणी फलक लावले नाहीत. या मार्गाचे काम सुरू होऊन चार ते पाच महिने झाले परंतु कामाची गती संथ आहे.
यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. कामामुळे झालेलया अरूंद रस्त्यावरून समोरासमोर वाहने आल्यास साईड देताना अडचण निर्माण होत आहे. तसेच ओव्हरटेक करणेही कठीण झाले आहे.
कामशेत पवनानगर हा रस्ता पवनाधरण, ऐतिहासिक किल्ले, लेणी, पर्यटन केंद्र या ठिकाणी दिवसरात्र वर्दळ असते. रस्ता एका बाजूने सिंमेट काँक्रीट व दुसऱ्या बाजूला खड्डी टाकल्याने रस्त्यावरून कोणत्या बाजुने रात्री जावे असा प्रश्न निर्माण होत आहे.
तसेच फलक लावले नसल्याने वाहने खडी टाकलेल्या रस्त्यावरून जाताना रस्ता वर खाली असल्यामुळे रात्रीच्या सुमारास समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे एकमेकांना वाहने धडकण्याचेही प्रमाणही वाढले आहे.- नितिन लायगुडे, स्थानिक नागरिक