आज मातृदिन आहे. दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा जगभर मदर्स डे म्हणजे मातृदिन म्हणून साजरा केला जातो. तसा प्रत्येक देशात मातृदिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्याकडे नाही का श्रावणी अमावस्येला आपण मातृदिन साजरा करतो.
मातेसाठी आपल्याकडे कितीतरी सुभाषिते, गाणी, कविता आहेत. सर्व हृदयस्पर्शी आहेत. ऐकताना मन भरून येते. विशेष म्हणजे आईची महती शब्दांत सांगता येण्यासारखी नाही, मात्र तरीदेखील काही चित्रपटांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून आईचं सुंदररित्या वर्णन केलं आहे. चला तर पाहुयात खास आईवर चित्रीत करण्यात आलेली ही गाणी…
एकटी एकटी घाबरलीस ना
तुझे सब हैं पता मेरी माँ
मम्मा
ऐसा क्यों माँ
लुका छुपी
मेरी माँ
चूनर
तू कितनी अच्छी है