मुंबई – शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे त्यासाठी नियमित योगासने करण्याचा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला 2014 सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने 2015 पासून 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.आज देशभर योग दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सेलिब्रेटींपासून ते अनेक राजकारणी मंडळींनी देखील या दिवसाची सुरुवात मोठ्या आनंदात घालवल्याचे पाहायला मिळाले. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील आपला योगा करतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
वाढलेल्या पोटावरून एकदा ओमराजे यांनी अधिकाऱ्यांना झापलं होतं. यावरून ओमराजे हे किती फिटनेस प्रिय आहेत हे समजते. आज योग दिनाचे औचित्य साधत त्यांनी व्यायाम करतानाची पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांचे काही फोटो तसेच व्हिडीओ देखील पाहायला मिळत आहेत.
ओमराजे यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहेत. एवढच काय पण ते अगदी योग गुरु रामदेव बाबा यांच्याप्रमाणे पोट फिरवताना देखील दिसत आहेत. निंबाळकर यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
#InternationalYogaDay#yoga #workout #योग #yogaday2023 pic.twitter.com/CSQNcoX22d
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) June 21, 2023
अधिकाऱ्यांना सुनावलं होत
ओमराजे यांनी मे महिन्यात पोकरा योजनेच्या आढावा बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी अधिकाऱ्यांचं पोट वाढलेलं पाहून त्यांनी सरळ त्यांना झापलं होत. बीपी शुगरवाल्यांनो जरा व्यायाम आणि योगा करत जा.. ढेऱ्या कमी करा आणि जमत नसेल तर राजीनामा द्या असं ओमराजेंनी यावेळी अधिकाऱ्यांना सुनावलं होतं.