IND vs ENG : ‘बुमराह लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार…’, भारताच्या माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

IND vs ENG Jasprit Bumrah Quitting Test Cricket : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही, त्यामुळे तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. भारतीय संघाचे दोन महत्त्वाचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विकेट्स मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
या सामन्यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे जसप्रीत बुमराह विकेटसाठी संघर्ष करताना दिसला. अशात मोहम्मद कैफने बुमराहबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. तिसऱ्या दिवशी बुमराह आपल्या नेहमीच्या लयीत दिसला नाहीत. त्याच्या गोलंदाजीचा वेग १२५ ते १३० किमी प्रति तास इतका होता, जो यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. भारतीय संघाला बुमराहकडून जास्तीत जास्त विकेट्सची अपेक्षा आहे, पण या सामन्यात या स्टार गोलंदाजाला केवळ एकच विकेट मिळाली आहे.
बुमराह लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल –
View this post on Instagram
दरम्यान, जसप्रीत बुमराहबाबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते बुमराहच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या शक्यतेबद्दल बोलत आहे. मोहम्मद कैफलाही तिसऱ्या दिवशी बुमराहची गोलंदाजी पाहून आश्चर्य वाटले. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कैफ म्हणाला, “मला वाटतं की जसप्रीत बुमराह लवकरच कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार नाही. तो त्याच्या शारीरिक स्थितीशी झगडत आहेत आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. या सामन्यात त्याच्या गोलंदाजीत वेग दिसला नाही.”
हेही वाचा – IND vs ENG : बेन स्टोक्सने ठोकले ऐतिहासिक शतक, इंग्लंडसाठी असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार
बुमराह खूप आत्मसन्मान असलेला व्यक्ती –
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “बुमराह खूप आत्मसन्मान असलेला व्यक्ती आहे. जर त्याला वाटलं की तो पूर्ण क्षमतेने कामगिरी करू शकत नाहीत किंवा विकेट्स घेऊ शकत नाही, तर तो स्वतःला कसोटी क्रिकेटपासून दूर ठेवू शकतो. त्याला विकेट मिळू किंवा न मिळू, पण ते १२५-१३० च्या वेगाने गोलंदाजी करत आहेत. ज्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली, तो चेंडू यष्टिरक्षकाने पुढे झेप घेत पकडला. फिट असलेल्या बुमराहचा वेग इतका कमी नसतो. त्याचे चेंडू खूप वेगाने मागे जातात.”
हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! इंग्लंडमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
भारतीय संघ बुमराहवर अवलंबून –
इंग्लंड मालिकेपूर्वी असं बोललं जात होतं की जर जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली तर भारतीय संघ मालिका जिंकेल, पण जर बुमराह प्रभावी ठरत नाही तर जिंकणं कठीण होईल. अनेकदा असं पाहायला मिळालं आहे की जेव्हा बुमराह उत्कृष्ट गोलंदाजी करतो, तेव्हा इतर गोलंदाजांची त्याला साथ मिळत नाही.





