IND vs ENG : जसप्रीत बुमराहचा कहर! कपिल देवचा विक्रम मोडत गुंडाळला इंग्लंडचा डाव

जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देवचा विक्रम –
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूंवर दोन मोठ्या विकेट्स घेत इंग्लंडला जोरदार धक्के दिले. यासह, इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने कपिल देव यांना मागे टाकले आहे. इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ईशांत शर्माच्या नावावर आहे. ईशांतने २०११ ते २०२१ या काळात इंग्लंडमध्ये १५ कसोटी सामन्यांत ५१ विकेट घेतल्या आहेत.
Innings Break!
England are all out for 387 in the 1st innings
Jasprit Bumrah the pick of the bowlers with 5/74 🙌
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/0bkkeqskhe
— BCCI (@BCCI) July 11, 2025
इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स इशांत शर्माच्या नावावर –
या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. त्याने इंग्लंडमध्ये ११ कसोटी सामन्यांत ४६ विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेत बुमराहला इंशांत शर्माला मागे टाकण्याची संधी आहे. कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये १३ कसोटी सामन्यांत ४३ विकेट घेतल्या होत्या आणि आता ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत शुबमन गिल आणि अंपायरची जुंपली, काय होतं कारण? पाहा VIDEO
बुमराहची सातत्यपूर्ण घातक गोलंदाजी –
FIFER for Jasprit Bumrah 🫡
His maiden five-wicket haul at Lord’s in Test cricket 👏👏
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/AfyXq9r6kD
— BCCI (@BCCI) July 11, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. लीड्स येथे झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने घातक गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, वर्कलोड व्यवस्थापनामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकला नाही. आता तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत त्याने पुन्हा आपली चमक दाखवली आहे. आता तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत इंशांत शर्माला कधी मागे टाकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हेही वाचा – Wimbledon 2025 : मोठा उलटफेर! सबालेंकाचा पराभव करत अनिसिमोवाची फायनलमध्ये धडक, स्वियातेकशी होणार सामना
इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ ४ बाद २५१ धावांवर संपवला होता. त्यावेळी जो रूट ९९ धावांवर आणि बेन स्टोक्स ३९ धावांवर खेळत होते. यानंतर दुसऱ्या दिवशी जो रूटने शतकी, तर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ३८७ धावांपर्यंत मजल मारता आला. भारताकडून बुमराहने सर्वाधिकपाच विकेट्स घेतल्या, तर रेड्डी-सिराजने प्रत्येकी दोन आणि जडेजाने एक विकेट्स घेतली





