इंदूर – बंगालच्या पहिल्या डावातील २२८ धावांच्या आव्हानाला मध्यप्रदेश संघाने जोरादार प्रत्युत्तर देताना पहिल्या रणजी करंडक स्पर्धेच्या क गटातील लढतीमध्ये १ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारली. या लढतीतून वर्षभरानंतर स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या मोहम्मद शमीला पहिल्या दिवशी एकही बळी टिपता आला नाही.
Stumps Day 1: Madhya Pradesh – 103/1 in 29.6 overs (Rajat Patidar 41 off 55, Subhransu Senapati 44 off 103) #MPvBEN #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 13, 2024
इंदूर येथील होळकर क्रिकेट मैदानावर बुधवारपासून सुरु झालेल्या बंगाल व मध्य प्रदेश दरम्यानच्या लढतीमध्ये मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून बंगालला फलंदाजीचे निमंत्रण दिले. बंगाल संघाचा पहिला डाव ५१.२ षटकांत २२८ धावांमध्ये संपुष्टात आला. बंगाल संघाकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक ९२ धावांचे योगदान दिले. त्याला अनुस्तुप मजुमदारने ४४ धावा करताना सुरेख साथ दिली. इतर फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. मध्य प्रदेश संघाकडून अर्णय पांडे व कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी ४ बळी टिपले तर अनुभव अग्रवाल व कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
बंगाल संघाचा डाव पहिल्याच दिवशी २२८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर सुभ्रांशु सेनापती व हिमांशू मंत्री यांनी मध्य प्रदेशच्या डावाची सुरुवात केली. त्यांनी ५१ धावांची सलामी दिली. १३ धावांवर असताना हिमांशू मंत्रीला मोहम्मद कैफने यष्टीचित पकडले. त्यानंतर सुभ्रांशु सेनापती व रजत पाटीदार यांनी नेटाने किल्ला लढविताना दिवस अखेर मध्य प्रदेश संघाला १ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या दिवशी सुभ्रांशु सेनापती ४४ तर रजत पाटीदार ४१ धावांवर नाबाद राहिले.
Glimpse of Mohammed Shami’s bowling today against Madhya Pradesh in the #RanjiTrophy on the occasion of his return to Competitive Cricket after almost a year.
Special Thanks to @mp_score_update for the video. Do follow them in X & their Insta page for more updates on this game. pic.twitter.com/rEYP7au6oV
— CricDomestic (@CricDomestic_) November 13, 2024
शमीची पुन्हा सुरुवात
सुमारे वर्षभरानंतर पुनरागमन करणाऱ्या शमीने गोलंदाजीला सुरुवात केली. आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये त्याने केवळ १६ धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये देखील दमदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमी व मोहम्मद कैफ या बंधूनी चांगली गोलंदाजी केली. मात्र मोहम्मद शमीला पहिल्या दिवशी यश मिळू शकले नाही. शमीने पहिल्या दिवशी १० षटकांपैकी १ षटक निर्धाव टाकताना ३४ धावा दिल्या. मोहम्मद कैफने ८ षटकांत ३१ धावांच्या मोबदल्यात १ बळी मिळविला.
Gujarat Titans : गुजरात टायटन्सचा IPL 2025 पूर्वी मोठा निर्णय, पार्थिव पटेलला दिली मोठी जबाबदारी…
शमी अजूनही फिट नाही… ?
सुमारे वर्षभरानंतर पुनरागमन करणारा शमी गोलंदाजी करताना अडखळत असल्याच्या काही प्रेक्षकांनी पोस्ट केल्या आहेत. शमी घोट्याच्या दुखापतीतून सावरला असल्यानेच त्याने रणजी स्पर्धेतून पुनरागमन केले आहे. मात्र काही चाहत्यांनी गोलंदाजी करताना डाव्या घोट्याला त्रास होत असल्याच्या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाला की नाही, याबाबत साशंकता आहे.