नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाच्या वेळी अनेक सेलिब्रेटींनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा देणारे ट्विट केले होते. तर मोजक्याच सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी सरकारच्या बाजुने ट्विट करण्यासाठी सेलिब्रेटींवर दबाव टाकल्याचे आरोप झाले होते. आता एका सेलिब्रेटीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना चीनने गलवान खोऱ्यात फडकवलेल्या झेंड्यावरून सवाल केला आहे.
गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने ट्विट करून म्हटलं की, नमस्कार नरेंद्र मोदी, अमित शाह. लाल डोळे राहू द्या, एकदा हेच बोलून दाखवा की, चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला. शौर्याच्या गप्पा करणारे आता गप्प का ? चीनच्या दोन-चार ऍपवर बंदी घालणार नाही का ? 56 इंचाची छाती चिनी माल निघाली का ? असा खोचक सवाल विशाल ददलानीने उपस्थित केला.
Hello @narendramodi @AmitShah.
“Laal-aankhein” rehne do, ek baar bolke toh dikha do ke “China ne Bharat ki zameen par kabza kiya hai”.
Bhaashanon mein itni veerta jhaadne vaalon, ab chup kyun baithe ho?
2-4 App nahin ban karoge? 😆😱
56″ ka seena “China ka maal” nikla? https://t.co/tS40SV5Xw9
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) January 2, 2022
विशाल ददलानीने यावेळी चीनने गलवानमध्ये चिनी झेंडा फडकवतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. याआधी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी देखील मोदींना सवाल केला होता.