नगर – हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख (Meteorologist Panjabrao Dakh) यांना स्वामी रामानंद तीर्थ गौरव पुरस्कार (Swami Ramanand Teerth Gaurav Award, )जाहीर झाला आहे. मराठवाडा मित्रमंडळातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. रविवारी (17 सप्टेंबर) दुपारी चार वाजता नगरमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कांकरिया यांनी दिली आहे.
मराठवाड्यात जन्मलेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा मराठवाड्याच्या बाहेर उमटविलेल्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पंजाबराव डख यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
दरम्यान, हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत राहिले आहे. मराठवाड्यासह राज्यभरात त्यांच्या पावसाच्या अंदाजामुळे ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे अंदाज बहुतांशवेळी तंतोतंत आल्याने राज्यात त्यांना मानणारा मोठा शेतकरी वर्ग आहे. तर काही वेळा त्यांचे अंदाज चुकीचे ठरल्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेचे धनी देखील व्हावे लागले आहे.