नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर त्यांना आता बंगलाही देण्यात आला आहे. सदस्यत्व बहाल केल्याच्या एका दिवसानंतर लोकसभा गृहनिर्माण समितीने राहुल यांना १२ तुघलक लेन येथे बंगला देण्यात आला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशभर आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
राहुल गांधी संसदेत जाण्यापूर्वी या बंगल्यात राहत होते. हा बंगला 2004 पासून राहुल गांधींच्या नावावरअलोट होता. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली , त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींचे सदस्यत्व बहाल करणारी अधिसूचना जारी केली. त्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी बंगला मिळण्याचा मार्ग देखिल मोकळा झाला होता. त्यानुषंगाने आता राहुल यांना सरकारी निवासस्थान मिळाले आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी कोर्टाचे दार ठोठावले होते. मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले होते. मात्र आता पुन्हा खासदारकी मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला होता. अशात राहुल गांधी यांनी आपल्याला पुन्हा शासकीय बंगला मिळताच प्रतिक्रिया दिली आहे. मेरा घर पूरा हिंदुस्तान है’ असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
#WATCH | “Mera ghar poora Hindustan hai,” says Congress MP Rahul Gandhi when asked for a reaction on media reports about getting back his official residence as an MP
He has arrived at the AICC Headquarters for a meeting with the leaders of Assam Congress. pic.twitter.com/KtIzZoRPmm
— ANI (@ANI) August 8, 2023
मोदी आडनाव प्रकरणात राहुलला यांना शिक्षा
मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना शिक्षा सुनावण्यात आली होती. मोदी आडनाव प्रकरणी सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही गेले. यासोबतच त्यांचा सरकारी बंगलाही परत घेण्यात आला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्या बाजूने निकाल देत त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली.