वाघोली – केसनंद ग्रामपंचायत निधीतून ज्येष्ठांसाठी गावात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन गावडे, उपसरपंच रूपाली गणेश हरगुडे, माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांच्या हस्ते बैठक व्यवस्थेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी सरपंच तानाजी हरगुडे, एस पी हरगुडे, तानाजी बांगर, सचिन जाधव, प्रकाश जाधव, दिलीप हरगुडे, शिवाजी हरगुडे, रमेश हरगुडे, राजेंद्र दरेकर, दशरथ गायकवाड, सुभाष बांगर, उमेश मोरे, दिनेश झांबरे, बाजीराव साळुंके, अतुल हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, गणेश येवले, सचिन हरगुडे, काकासाहेब हरगुडे, गणेश हरगुडे, अलका सोनवणे, विशाल हरगुडे, प्रमोद हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“केसनंद ग्रामपंचायतीच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिक तसेच इतरांसाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या वतीने निधी द्वारे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा.”
– प्रमोद हरगुडे, सदस्य, ग्रामपंचायत केसनंद